सुरत- सैन्यदलात पिशव्यांसह पॅराशुटमध्ये वापर होणाऱ्या जिओफॅब्रिकची मागणी वाढली आहे. या जिओफॅब्रिकचे सुरतमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यास सुरुवात झाली आहे.
जिओफॅब्रिकचा वापर मुख्यत: महामार्गाच्या कामासाठी करण्यात येतो. यापूर्वी अंकलेश्वरमध्ये जिओफॅब्रिकचे उत्पादन केवळ अंकलेश्वरमधील उत्पादन प्रकल्पामध्ये करण्यात येत होते. अनेक लघू उद्योगांनी जिओफ्रॅब्रिकचे सुरतमध्ये उत्पादन सुरू केले आहे. असे असले तरी देशात लागणाऱ्या जिओफॅब्रिकपैकी ४० टक्के जिओफॅब्रिकची देशात आयात करण्यात येते.
वाहतुकीचा ताण सहन करण्यासाठी महामार्ग मजबूत असणे आवश्यक असतात. त्यासाठी महामार्गावर जिओफॅब्रिक आणि त्यावर काँक्रिटचा थर टाकला जातो. त्यामुळे रस्ते ही जलप्रतिरोधक होतात. जिओफॅब्रिक हे पावसाचे पाणी रस्त्यामधून जमिनीत जाण्यापासून थांबविते. त्यामुळे मुसळधार पावसातही रस्ता खचून होणारे नुकसान टाळता येते.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या समितीचे चेअरमन भारत गांधी म्हणाले, की देशात दररोज सरासरी ६०० ते ७०० किमीचे महामार्ग, राज्य मार्गांची कामे केली जातात. प्रत्यक्षात, केवळ ४० टक्के रस्ते कामासाठी जिओफॅब्रिकचा वापर करण्यात येतो. जिओफॅब्रिकचा महामार्गांच्या कामासाठी वापर हा महत्त्वाचा असल्याचेही गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारने विदेशातील आयातीचे प्रमाण कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर भर देण्यास सुरुवात केली आहे.