नवी दिल्ली - केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी अॅपवर कायम स्वरुपाची बंदी लागू केल्यानंतर चीनने भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर करत भारताकडून चीनच्या अॅपवर बंदी आणण्यात येत असल्याचा आरोप चीनने केला आहे.
भारतामधील चीनच्या राजदूत कार्यालयाचे प्रवक्तेे जी राँग यांनी ट्विट करत भारतावर आरोप केला आहे. चिनी अॅपवर बंदी लागू करताना जागतिक व्यापारी संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) नियमांचे आणि बाजाराच्या तत्वांचे उल्लंघन केल्याचा त्यांनी ट्विटमध्ये आरोप केला आहे.
भारताने पक्षपाती टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि द्विपक्षीय संबंधाचे नुकसान टाळावे असे प्रवक्त्याने म्हटले आहे. चीनच्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय नियम आणि स्थानिक कायद्यांचे पालन करण्यास सांगण्यात येते, असा चीनच्या प्रवक्त्याने दावा केला आहे.
हेही वाचा-शेअर बाजारातील गुंतवणुकदारांनी चार दिवसात गमाविले ८ लाख कोटी!
जेएनयूमधील चीनविषयक अभ्यासक प्रा. श्रीकांत कोंडापल्ली हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, भारत-चीनमध्ये सीमारेषेवर तणाव होता. तेव्हा सरकारला भारतीय सुरक्षेची काळजी वाटत होती. जर चीनकडून नियमांचे पालन होत नसेल तर भारत या नियमांचे पालन कसे करेल?
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून ग्रामीण स्थानिक संस्थांना १२,३५१ कोटी रुपये मंजूर
पुढे प्राध्यापक कोंडापल्ली म्हणाले की, जागतिक व्यापारी संघटनेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. चीनने गुगल, युट्युब, फेसबुक, ट्विटर आणि इतर कंपन्यांवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे दुटप्पी असलेल्या चीनकडून भारतावर कसे आरोप होऊ शकतात? दरम्यान, गलवानच्या प्रांतात चीन-भारतामध्ये तणावाची स्थिती होती. तेव्हा जूनमध्ये भारताने ५९ चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. त्यामध्ये टिकटॉक, अलीबाबा व युएस ब्राऊझर या अॅपचा समावेश आहे.