मुंबई - देशात पहिले साखर संग्रहालय हे पुण्यातील शिवाजीनगर येथे सुरू होणार आहे. साखर उद्योगाचा देशातील इतिहास आणि उद्योगात महत्त्वाचा वाटा आहे. त्या पार्श्वभूमीवर साखर संकुलमध्ये साखर संग्रहालय सुरू करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
साखरेमुळे ग्रामीण महाराष्ट्राचा कसा कायापालट झाला हे संग्रहालयात दाखविण्यात येणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, पुण्यातील वसंतदादा साखर इन्स्टीट्यूटमध्ये संग्रहालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील साखरेचे हब मानले जाते. तसेच ऊसाची लागवड आणि साखर कारखान्यांसाठी पुणे विभाग हा हब मानला जातो. याशिवाय पुण्यात इतर उद्योगही आहेत. साखर आणि ऊस हा राज्यांच्या राजकारणाचा कणा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप हे राजकारणांसाठी त्याकडे आकर्षित आहेत.
हेही वाचा-पुण्यात केक कापून कोरोनाचा पहिला वाढदिवस साजरा
उसाचे राज्याच्या राजकारणात महत्त्व-
- ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. राज्यामध्ये सहकारी चळवळ ही १९५० पासून सुरू झालेली आहे. त्यावेळी विठ्ठलराव विखे-पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी पहिला सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू केला होता.
- सध्या, राज्यात १७० हून अधिक सहकारी साखर कारखाने आहेत. देशातील साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा एक पंचमांश हिस्सा आहे. उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा साखर उत्पादनात देशात दुसरा क्रमांक आहे.
हेही वाचा-फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण