नवी दिल्ली - स्मार्टफोनच्या वापराचे देशात प्रचंड प्रमाण वाढले आहे. भारतीयांनी फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅफॉर्मसवर १८८ अब्ज मिनिटे घालविली आहेत. त्यामध्ये ६९ अब्ज मिनिटे ही दैनंदिन मालिकेवर तर ३१ अब्ज मिनिटे ही सिनेमा पाहण्यात घालविली आहेत.
ओटीटी सबस्क्रीप्शन आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने अनेकजणांकडून इंटरनेटचा वापर वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये वूटमध्ये सर्वाधिक दैनंदिन मालिका पाहण्यात आल्या आहेत. सिनेमा पाहण्याचे सर्वाधिक म्हणजे ३३ टक्के प्रमाण हॉटस्टारमध्ये आहे. ही माहिती बंगळुरूस्थित रेडसीरने दिली आहे.
हेही वाचा-मौल्यवान धातुंच्या दरात घसरण सुरुच; चांदी प्रति किलो 331 रुपयांनी स्वस्त
- कोरोनाच्या काळात वापरकर्त्यांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. तसेच आघाडीचे प्रोडक्शन हाऊस ओटीटी प्लॅटफार्मवरून सिनेमा प्रदर्शित करत आहेत. नवीन कंटेन्ट असल्याने ओटीटीला वापरकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे रेडसीरचे निखील दलाल आणि उज्वल चौधरी यांनी सांगितले.
- जिओफायबरसारख्या कंपनीचे ग्राहक हे मोफत मिळणाऱ्या प्राईम आणि नेटफ्लिक्सचा वापर करत आहेत. तसेच विविध कंपन्यांकडून ओटीटीवर सवलत मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून ओटीटीच्या वापरकर्त्यांचे प्रमाण वाढल्याचे विश्लेषकांनी अहवालात म्हटले आहे.
- हॉटस्टार आणि डिस्ने, वूट सलेक्ट आणि विविधि एसव्हीओव्हीडी प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. यामध्ये होईचोई आणि सननेक्टचा समावेश आहे. स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांचे प्रमाण वाढल्यानेही ओटीटीचा वापर वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.