बंगळुरू - वेळखाऊ कामांमुळे कार्यालयामध्ये काम करणाऱ्या देशातील ६३ टक्के कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना पूर्ण क्षमतेने मदत करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. ही माहिती २०२१ ऑफिस वर्कर सर्वेक्षणामधून समोर आली आहे.
युआयपाथसचे वरिष्ठ उपाध्यक्ष टॉम क्लान्सी यांनी २०२१ ऑफिस वर्कर सर्वेक्षणाची माहिती दिली आहे. कार्यालमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ईमेलमध्ये ६६ टक्के, शेड्युल्ड कॉल आणि मीटिंगमध्ये ६२ टक्के आणि डाटासेट करणे ५६ टक्के असा वेळ जात असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. तर जगभरात काम करणाऱ्या ६७ टक्के कर्मचाऱ्यांनी एकच काम पुन्हा करत असल्याचे म्हटले आहे. ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी कामांमध्ये नवनिर्मितीची परवानगी नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-'ब्लॅक फंगसचा सामना करण्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा पंतप्रधान लवकरच करतील'
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे
कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. तसेच ऑटोमेशन आणि इतर डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून कर्मचाऱ्यांना उर्जा देणे शक्य असल्याचे टॉम क्लान्सी यांनी म्हटले आहे. युआयपाथने घरातून काम करणाऱ्या जगभरातील अनेक कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. गतर्षीपासून त्यांच्या कामावर काय परिणाम झाला याची माहिती सर्वेक्षणातून घेण्यात आली आहे.
हेही वाचा-मुळचे मुंबईकर रियूबेन बंधू ठरले यूकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती!
ऑटोमेशन सॉफ्टवेअरचे प्रमाण भारत आणि सिंगापूरमध्ये सर्वाधिक
अनेक संस्थांनी ऑटोमेशन स्वीकारल्याचेही सर्वेक्षणात आढळले आहे. भारत आणि सिंगापूरमध्ये ऑटोमेशन सॉफ्टवेअरचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिंगापूरमधील कंपन्यांमध्ये ५१ टक्के ऑटोमेशन तर भारतामधील कंपन्यांमध्ये ४४ टक्के ऑटोमेशन आहे. भारतामधील ६५ कर्मचाऱ्यांनी ऑटोमेशनचे प्रशिक्षण मिळाले आहे. तर ऑटोमेशनमुळे ९४ टक्के नोकऱ्यांमधील कामगिरीत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. डिजीटल परिवर्तनामुळे भविष्यातील काम करण्याची पद्धत बदलणार आहे. त्यामुळे कौशल्यात वाढ करण्याची गरज सर्वेक्षणात सहभागी घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.