ETV Bharat / business

ऑटोहब वुहानला कोरोनाचा फटका; भारतीय वाहन उद्योगाची वाढली चिंता - कोरोना परिणाम

कोरोनाचा भारतीय वाहन उद्योगावर किती परिणाम होणार, हे सांगणे घाईचे होईल, असे एसआयएएमचे संचालक राजेश मेनन यांनी सांगितले.

Auto Industry
वाहन उद्योग
author img

By

Published : Feb 10, 2020, 5:12 PM IST

ग्रेटर नोएडा - चीनमधील वुहान शहरामधून देशातील वाहन उद्योगांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. कोरोना विषाणुजन्य रोगामुळे वुहानमधील उद्योग ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत भारतीय वाहन उद्योगावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सदस्य कंपन्यांकडून माहिती गोळा केली जात असल्याचे सांगितले. चीनमधून वाहनांच्या सुट्टे पार्ट निर्यात करण्याचे प्रमाण किती कमी होणार आहे, हे येत्या काही दिवसात समजू शकणार आहे. कोरोनाचा भारतीय वाहन उद्योगावर किती परिणाम होणार, हे सांगणे घाईचे होईल, असे एसआयएएमचे संचालक राजेश मेनन यांनी सांगितले. सर्वजण चीनमधील नव्या वर्षाच्या सुट्टीनंतर बाजार खुला होण्याची वाट पाहत आहेत.

हेही वाचा-कोरोनाचे थैमान : मृतांची संख्या ८०० वर, सार्सच्या बळींचा आकडा ओलांडला

वुहान हे चीनमधील महत्त्वाचे ऑटो हब आहे. नेमके याच ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे.

कोरोनाममुळे चीनमध्ये ८१० जणांचा बळी-

कोरोना विषाणू संसर्गाने चीनमध्ये थैमान घातले आहे. येथे मृतांची संख्या तब्बल ८१० झाली आहे. २००३ मध्ये सार्सच्या संसर्गामुळे गेलेल्या बळींचा आकडाही आता कोरोनाने मागे टाकला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, सार्समुळे ९ महिन्यांमध्ये ७७४ बळी गेले होते. हा आजार तब्बल २६ देशांमध्ये पसरला होता.

हेही वाचा-कोरोना विषाणू : आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.