ETV Bharat / business

जी २० परिषद : ५० अब्ज डॉलर व्यापार करण्याचे भारत-इंडोनेशियाचे उद्दिष्ट

author img

By

Published : Jun 29, 2019, 7:42 PM IST

Updated : Jun 29, 2019, 8:00 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनिशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो हे  जी २० परिषदेच्या निमित्ताने जपानमधील ओसाकामध्ये आले आहेत. दोघांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याकरता आज द्विपक्षीय चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनिशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो

ओसाका - भारत आणि इंडोनेशियाने आज महत्त्वाकांक्षी असे २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलर व्यापार करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याबाबत सहकार्य वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्यात सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सागरी सुरक्षा या विषयांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो हे जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमधील ओसाकामध्ये आले आहेत. दोघांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याकरता आज द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांनी २०२५ पर्यंत ५० अब्ज डॉलरचा व्यापार करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.
शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.