ETV Bharat / business

जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याकरता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - GST Council on GST annual returns

कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या नियमांमुळे व्यवसाय सुरळितपणे चालू शकले नाहीत. तर देशाच्या काही भागात अद्यापही व्यववसाय सुरू झाले नाहीत. त्यामुळे जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सीबीआयसीकडे विविध उद्योगांनी विनंती केली होती.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Oct 24, 2020, 5:37 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची दोन महिन्यांनी मुदतवाढ दिली आहे. जीएसटी नोंदणी करणाऱ्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे जीएसटीचे विवरणपत्र ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही मुदतवाढ दिली होती.

जीएसटी वार्षिक विवरणपत्र (जीएसटीआर-९) आणि जीएसटीआर-९ सी हे विवरणपत्र भरण्याकरता मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि उत्पादन शुल्काने (सीबीआयसी) जाहीर केला आहे.

कोरोनाने उद्योगांवर परिणाम-

कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या नियमांमुळे व्यवसाय सुरळितपणे चालू शकले नाहीत. तर देशाच्या काही भागात अद्यापही व्यववसाय सुरू झाले नाहीत. त्यामुळे जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सीबीआयसीकडे विविध उद्योगांनी विनंती केली होती. या स्थितीचा विचार करता जीएसटी समितीने जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी हे विवरणपत्र भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरहून ३१ डिसेंबर २०२० मुदतवाढ देण्याला संमती दिली आहे.

काय आहे जीएसटीआर-९?

जीएसटीआर ९ हा परताव्याचे विवरणपत्र वस्तू व सेवा कराची (जीएसटी) नोंदणी करणाऱ्या करदात्यांकडून भरण्यात येते. त्यामध्ये उद्योग अथवा व्यवसायात आलेला माल अथवा बाहेर गेलेल्या मालाची विविध करांतर्गत नोंदणी होते.

काय आहे जीएसटीआर-९ सी?

जीएसटीआर-९ सी मध्ये वार्षिक आर्थिक कामगिरीचे आकडेवारी असते. ज्या उद्योगांची उलाढाल ३ कोटीहून अधिक आहे, अशा उद्योगांना जीएसटीआर-९ सी भरणे बंधनकारक असते. तर रिकन्सिलेशन स्टेमेंट हे वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांहून अधिक असेल तर अशा उद्योगांना द्यावे लागते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.