ETV Bharat / business

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चीनला इशारा ; अमेरिकेने आयात शुल्क वाढविल्यास विकासदर आणखी घसरणार

author img

By

Published : Aug 10, 2019, 6:09 PM IST

चालू वर्षात चीनचा विकासदर हा ६.२ टक्के राहिल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे. मात्र हा अंदाज वर्तविताना अतिरिक्त आयात शुल्काचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विचार केला नाही.

संग्रहित - शी जिनपिंग आणि ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकेबरोबर व्यापारी युद्ध सुरू असताना चीनची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. अशा स्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादित मालावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका बसून चीनचा आर्थिक विकासदर आणखी कमी होवू शकतो, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिला आहे.

चालू वर्षात चीनचा विकासदर हा ६.२ टक्के राहिल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे. मात्र हा अंदाज वर्तविताना अतिरिक्त आयात शुल्काचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने विचार केला नाही. अमेरिकेने चीनच्या उत्पादित मालावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू केले तर चीनच्या विकासदर कमी होईल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. चीनने विपरित असलेल्या बाजार अवस्थेला तोंड देण्यासाठी विदेशी विनिमयाचा वापर करायला हवा, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे.

यावर्षी चीनला तोडगा काढून सौदा पूर्ण करायचा आहे. गेली अनेक वर्षे, दशकात चीनला मागील वर्ष अत्यंत वाईट गेले आहे. ते आणखी वाईट होत आहे. हजारो कंपनी चीनमधून निघून जात आहेत. त्यांना सौदा करायचा आहे. मात्र मी सौदा करायला तयार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.

नुकतेच अमेरिकेच्या कोषागाराने चीनचे चलन हे नियमभंग करणारे असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर युवान चलनाचा दर घसरला आहे. अमेरिकेकडून १ सप्टेंबरला आयात शुल्काची नवी फेरी जाहीर करण्यात येणार आहे. अमेरिकेबरोबरील व्यापारात फायदा मिळावा, यासाठी चीनकडून युवानचे अवमुल्यन करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी शुक्रवारी केला होता.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.