नवी दिल्ली - मी कांदा अथवा लसूण फारसा खात नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले. कांद्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर सीतारामन बोलत होत्या.
लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी बँकांचे एनपीए आणि कांदे उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बुधवारी प्रश्न उपस्थित केला. सुळे म्हणाल्या, आपण तांदूळ आणि दूधासह इतर अनेक उत्पादनांची निर्यात करतो. तर कांद्याचे उत्पादन का घटले आहे? कांदा उत्पादक हे छोटे शेतकरी आहेत. त्यांचे सरंक्षण करण्याची गरज आहे. याला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, मी अशा कुटुंबामधून आले आहे. जिथे कांदा फारसा खात नाहीत. त्यावरून विरोधकांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-सलग दोन महिने घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये सेवा क्षेत्रात सुधारणा : आयएचएस मर्किट इंडिया
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणारे सरकारचे आर्थिक धोरण असल्याचे सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, मी २०१४ पासून मंत्रिगटाचे सदस्य आहे. हा गट कांदे बाजारपेठेतील चढ-उतारावर देखरेख ठेवतो. जेव्हा कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाले तेव्हा त्यांना मदत केली आहे. तसेच कांदे निर्यात करणाऱ्यांनाही मदत केली आहे. कांदा निर्यात करणाऱ्यांना ५ ते ७ टक्के मदत करण्याचे आदेश आपण स्वत: एका रात्रीत काढले आहेत.
हेही वाचा-आरबीआयकडून रेपो दर 5.15 टक्के कायम; जीडीपीतील अंदाजित आकडेवारीत कपात
कमी उत्पादन झाल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. तसेच कांद्याच्या दराबाबत अनेक रचनात्मक समस्या आहेत. कांद्याच्या साठवणुकीची वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत अशी पद्धत आपल्याला माहीत नाही. कांदा साठवणुकीची वैज्ञानिक सुविधा उपलब्ध करण्यावर आम्ही काम करत आहोत. त्यामुळे कांदे साठवुणकीसाठी चांगल्या सुविधा मिळणार आहेत. असा कांदा साठवणुकीच्या सुविधा लासलगाव परिसरात (जिल्हा नाशिक) मिळणार आहेत.
दरम्यान, बुधवारी देशाच्या काही भागात कांद्याचे दर १०० रुपये प्रति किलोवरून १५० रुपयापर्यंत पोहोचले होते. कांद्यांचे दर आटोक्यात येत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.