चेन्नई - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्या सरकारला मदत करत आहेत. वाहन कंपनी ह्युदांईने डॉक्टरांना आवश्यक असणारी सुमारे १० हजार वैयक्तिक संरक्षण साधने (पीपीई) कांचीपुरम जिल्हा प्रशासनाला दिली आहेत.
ह्युदांई मोटर इंडिया फाउंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीपीई आणि रेशनचे साहित्य हे जिल्हाधिकारी पी. पोन्नीयाह यांच्याकडे दिले. रेशनिंगचे साहित्य हे जिल्ह्यातील गरजुंसाठी देण्यात आले आहे.
हेही वाचा-सोन्याचा दर प्रति तोळा ५० हजार होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण
येत्या काही दिवसात तिरुवल्लूर आणि चेन्नईच्या जिल्हा प्रशासनाकडे १० हजार पीपीई आणि रेशनचे साहित्य देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ह्युदांईने तामिळनाडू मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रुपये दिले आहेत. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम हाती घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाने खनिज तेलाच्या किमतीला थंडावा; अठरा वर्षात बॅरलची किमत सर्वात स्वस्त!