ETV Bharat / business

चीनची हुवाई अमेरिकेच्या गुगलला देणार टक्कर; स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम लाँच - हार्मोनीओएस

हुवाईने गतवर्षी सप्टेंबरमध्ये हार्मोनीओएस ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली होती. ही ऑपरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअर बस, डाटा मॅनेजमेंट आणि सिक्युरिसह विविध डिव्हाईसवर चालणार असल्याचा हुवाईने दावा केला होता.

Huawei
हुवाई
author img

By

Published : Jun 3, 2021, 5:27 PM IST

बीजिंग - अमेरिकन तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी चीनच्या हुवाई या बलाढ्य दूरसंचार कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे. हुवाईने हार्मोनीओएस २.० ही स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टिम स्मार्टफोनसही विविध १०० डिव्हाईसवर चालू शकते.

अमेरिकेने २०१९ मध्ये चीनची कंपनी असलेल्या हुवाईवर निर्बंध लादले होते. तेव्हापासून हुवाईने स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टिम करण्यास सुरुवात केली होती. सध्या, गुगलच्या अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमचे बाजारपेठेत वर्चस्व आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स सुरुवातीला 350 अंकांनी वधारला

या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणार ऑपरेटिंग सिस्टिम
हुवाईने गतवर्षी सप्टेंबरमध्ये हार्मोनीओएस ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली होती. ही ऑपरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअर बस, डाटा मॅनेजमेंट आणि सिक्युरिसह विविध डिव्हाईसवर चालणार असल्याचा हुवाईने दावा केला होता. हुवाईने हार्मोनीओएसवर चालणारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि टॅब्लेट लाँच केले आहेत. त्यामध्ये हुवाई मेट ४९ सिरीज, हुवाई मेट एक्स २ आणि हुवाई वॉच ३ सिरीज आणि हुवाई मेटपॅड प्रो स्मार्टफोनचा समावेश आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का

ग्राहकांची गोपनीयता आणि सुरक्षितता यांचे संरक्षण करण्याकरिता कंपनी वचनबद्ध
हुवाईचे कार्यकारी संचालक रिचर्ड यू म्हणाले, की प्रत्येकजण हा संपूर्ण जोडलेल्या जगाचा एक भाग आहे. आम्ही अधिकाधिक भागीदार आणि डेव्हलपर्सच्या मदतीने हार्मोनीओएस इकोसिस्टिम वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामधून अधिक चांगला अनुभव, उत्पादने व सेवा ही जगभरातील आमच्या ग्राहकांना मिळेल, असा विश्वासही रिचर्ड यू यांनी व्यक्त केला. ग्राहकांची गोपनीयता आणि सुरक्षितता यांचे संरक्षण करण्यासाठी कंपनी वचनबद्ध असल्याचे हुवाईने म्हटले आहे.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात हुवाई कंपनीला लक्ष्य केले होते. त्यांनी हुवाईला अमेरिकन कंपन्यांचे तंत्रज्ञान घेण्यावर निर्बंध लादले होते. त्याचा मोठा फटका हुवाईच्या उत्पादनांना बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.