ETV Bharat / business

अनलॉक लॉकडाऊन 1.0 ; आदरातिथ्य सेवांसह मॉल ८ जूनपासून होणार सुरू - Ministry of home affairs on unlockdown 1

केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या टाळेबंदीच्या मार्गदर्शक सूचना या टाळेबंदी 1 उघडणाऱ्या (लॉकडाऊन 1.0 अनलॉक 1) असल्याचे म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 30, 2020, 8:53 PM IST

नवी दिल्ली - देशातील टाळेबंदी ही प्रतिबंधित क्षेत्रात (कंटेन्टमेंट) वाढवत असतानाच केंद्र सरकारने टाळेबंदी 1 (लॉकडाऊन 1) खुली केली आहे. चौथ्या टप्प्यातील टाळेबंदी ही 31 मे रोजी संपत असताना नवे नियम केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या टाळेबंदीच्या मार्गदर्शक सूचना या टाळेबंदी 1 उघडणाऱ्या (लॉकडाऊन 1.0 अनलॉक 1) असल्याचे म्हटले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

हेही वाचा-गेल्या 24 तासांमध्ये आढळले तब्बल 7 हजार 964 नवे रुग्ण

  • प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील सेवा 1 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
  • धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल आणि आदरातिथ्य सेवा हे ८ जूनपासून सुरू होणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा, मेट्रो, रेल्वे, सिनेमा हॉल, जिम, राजकीय सभा हे आढावा घेवून सुरू करण्यात येणार आहे.
  • शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, कोचिंग संस्था हे सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणार आहे.
  • राज्य व केंद्रशासित प्रदेश हे पालकांशी निर्णय घेवून शैक्षणिक संस्था जुलैपासून करू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
  • केंद्र सरकारने संचारबंदीची वेळ कमी केली आहे. मागील टाळेबंदीत रात्री 7 ते सकाळी सातवाजेपर्यंत संचारंबदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी अनलॉक 1.0 मध्ये रात्री नऊ ते पाच वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा-'आता खासगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई कीट देणार; मुंबई लोकल सुरू करण्याबाबत विचाराधीन'

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या-

भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 7 हजार 964 नवे रुग्ण आढळले असून 265 जणांच मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 73 हजार 763 झाला आहे, यात 86 हजार 422 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 82 हजार 369 कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत. तर 4 हजार 971 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातमी वाचा-गेल्या 24 तासांमध्ये आढळले तब्बल 7 हजार 964 नवे रुग्ण

अर्थव्यस्थेला बसला आहे फटका-

गेली दोन महिने उद्योग, व्यवसाय व विविध सेवा बंद राहिल्याने बेरोजगारीची समस्या देशात वाढत आहे. राज्य व केंद्र सरकारचा महसूल घटत असल्याने देशापुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशातच मागील आर्थिक वर्षातील विकासदर हा गेल्या 11 वर्षातील नीचांक असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

संबंधित बातमी वाचा-आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.