ETV Bharat / business

इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत ठरले हिंदूजा ब्रदर्स, तिसऱ्यांदा पटकाविला मान

हिंदुजा ग्रुपची सुरुवात कौटुंबिक व्यवसायापासून झाली. हा व्यवसाय त्यांनी मुंबईमध्ये १९१४ मध्ये स्थापन केला. हा व्यवसाय विस्तारून त्यांचे तेल, गॅस, बँकिंग, आयटी आणि इतर उद्योग जगभरात पसरले आहेत.

हिंदुजा ब्रदर्स
author img

By

Published : May 12, 2019, 12:49 PM IST

लंडन - मूळ भारतीय वंशाचे असलेले हिंदुजा बंधू हे तिसऱ्यांदा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हा मान हिंदुजा बंधुंनी तिसऱ्यांदा पटकाविला आहे. ही श्रीमंताची यादी संडे टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.

हिंदुजा बंधुमधील श्री (वय ८३) व गोपी (वय ७९) हे दोन बंधू लंडनमध्ये राहतात. हे दोन भाऊ हिंदुजा ग्रुपच्या उद्योग संपूर्णपणे सांभाळत आहेत. निर्यात व्यवसाय वाढविण्यासाठी हिंदुजा बंधू १९७९ मध्ये लंडनमध्ये गेले होते. तिसरे बंधू प्रकाश हे स्विस व जीनिव्हामध्ये वित्तीय व्यवसाय सांभाळतात.तर सर्वात लहान बंधू अशोक हे भारताशी निगडीत असलेले विदेशातील व्यवसाय पाहतात. हिंदुजा यांची संपत्ती गेल्या वर्षी १७० कोटी पौंडने वाढून २ हजार २०० कोटी पौंड झाल्याचे इंग्लंडमधील माध्यमाने म्हटले आहे.

मुंबईत सुरू झाला होता १९१४ मध्ये उद्योग-
हिंदुजा ग्रुपची सुरुवात कौटुंबिक व्यवसायापासून झाली. हा व्यवसाय त्यांनी मुंबईमध्ये १९१४ मध्ये स्थापन केला. हा व्यवसाय विस्तारून त्यांचे तेल, गॅस, बँकिंग, आयटी आणि इतर उद्योग जगभरात पसरले आहेत.

जुने महायुद्धाकाळातील कार्यालय असलेले लंडनमधील व्हाईटहॉल हीदेखील हिंदुजा बंधुंची मालकीची मालमत्ता आहे. या ठिकाणी आलिशान हॉटेल करण्याचा हिंदुजा बंधुंचा मानस आहे.

Intro:Body:

SKRIKANT

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.