ETV Bharat / business

कोरोनाशी लढा देण्याकरता 'हीरो' करणार १०० कोटींची तरतूद - कोरोना फंड

हीरो मोटर्स कंपनीचे चेअरमन पंकज मुंजाल म्हणाले, व्यवसायाची मुलभूत तत्वे पाळता संस्था मानवी दृष्टीकोन ठेवते. संस्थेच्या भोवतालचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी १०० कोटींचा निधी तयार ठेवण्यात येणार आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Mar 24, 2020, 1:55 PM IST

Updated : Mar 24, 2020, 2:51 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाशी लढा देण्याकरता हीरो सायकलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरता उपाययोजना म्हणून कंपनीकडून १०० कोटी रुपयांचा निधी बाजूला ठेवण्यात येणार आहे.

हीरो मोटर्स कंपनीचे चेअरमन पंकज मुंजाल म्हणाले, व्यवसायाची मुलभूत तत्वे पाळता संस्था मानवी दृष्टीकोन ठेवते. संस्थेच्या भोवतालचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी १०० कोटींचा निधी तयार ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा-' जागतिक अर्थव्यवस्थेच्या चलनवलनावर कोरोनाचा कायमस्वरुपी होणार परिणाम'

शक्य तेवढी मदत करण्यासाठी विविध राज्यांच्या सरकारांबरोबर संपर्क करण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मुंजाल यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर ते जवळून देखरेख ठेवत आहेत. कंपनीच्या वितरळ साखळीवर परिणाम झाला आहे. परिस्थिती पूर्ववत झाली तर वितरण साखळीचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा-कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही शेअर बाजार सुरू : गुंतवणूकदारांना 'ही' आहे भीती

Last Updated : Mar 24, 2020, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.