गांधीनगर - कोरोनाच्या महामारीत प्रत्येकाला मास्क वापरणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र, मास्क घातल्याने अनेकांना चेहरे ओळखू येणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मास्कवर ग्राहकांच्या चेहऱ्याचा फोटो डिजीटल प्रिटिंग करून देण्याचा व्यवसाय एका फोटोग्राफरने सुरू केला आहे.
गुजरातच्या गांधीनगरमधील बिल्लू शर्मा या फोटोग्राफरने डिजीटल प्रिंटेड मास्कचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांना त्यांच्या मास्कवर चेहऱ्याचा फोटो प्रिंट करून दिला जात आहे. याविषयी माहिती देताना शर्मा म्हणाले, की टाळेबंदीत खूप आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे काहीतरी नवीन व्यापार सुरू करण्याची इच्छा होती. यापुढे माणसांना मास्क कायम लागणार आहेत. मास्क घातल्यानंतर व्यक्ती कोण आहे, हे ओळखणे कठीण ठरत आहे. त्यामुळे मास्कवर चेहऱ्यांची प्रिटिंग करण्याची कल्पना सुचल्याचे शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा-महामारीने अनेकांपुढे जगण्याचे प्रश्नचिन्ह; १० पैकी एकाने गमाविली नोकरी
ग्राहकाचे काही फोटो काढून कॉम्प्युटवर इडिटिंग केले जाते. त्यानंतर मास्कवर प्रिटिंग केले जाते. त्यासाठी केवळ १० ते १५ मिनिटे लागतात. डिजीटल प्रिंटेड मास्क शर्मा ५० रुपयाला विकतात.
हेही वाचा-कोरोनाची चाचणी केवळ २०० रुपयात; सीएसआयआरचा रिलायन्सबरोबर करार
दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे मास्क विकले जात आहेत. काहीजण बॉलिवूडमधील अभिनेते तर काहीजण कार्टूनमधील व्यक्तीरेखांचे मास्क विकत आहेत.