ETV Bharat / business

जीएसटीचा घटला ओघ, अंतिम उद्दिष्टात केली १ लाख कोटींची कपात! - जीएसटी

केंद्र सरकारचे जीएसटीतून ७.४४ लाख कोटींच्या महसूल उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. सरकारने नवे उद्दिष्ट हे ६.४४ लाख कोटींचे जीएसटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

प्रतिकात्मक - जीएसटी
author img

By

Published : Feb 2, 2019, 9:04 PM IST

नवी दिल्ली - अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय व शेतकऱ्यांना खूश करणारे निर्णय घेतले जात असताना सरकारच्या महसुली उत्पन्नात घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. वस्तू आणि सेवा (जीएसटी) करातून येणारा महसूल घटल्याने केंद्र सरकारचे जीएसटीच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट हुकले आहे. याचा परिणाम म्हणून सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात जीएसटीचे उद्दिष्ट तब्बल १ लाख कोटींनी कमी केले आहे.

केंद्र सरकारचे जीएसटीतून ७.४४ लाख कोटींच्या महसूल उत्पन्नाचे उद्दिष्ट होते. सरकारने नवे उद्दिष्ट हे ६.४४ लाख कोटींचे जीएसटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
आर्थिक वर्ष २०१९-२०२० साठी सरकारने प्रत्यक्ष कराच्या महसुलाचे १३.८ लाख कोटी उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे पूर्वीच्या उद्दिष्टाहून १५ टक्क्याने वाढविले आहे. तर अप्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट हे ११.७ लाख कोटी करून ११.९ कोटी करण्यात आले आहे.

जानेवारीमध्ये जीएसटीच्या महसुलाच्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मात्र आर्थिक वर्षअखेर जीएसटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही सुधारणा पुरेशी नाही. असे असले तरी केंद्र सरकारला जीएसटीचे उद्दिष्ट चालू आणि पुढील आर्थिक वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास वाटत आहेत.
सीबीआयसीचे चेअरमन प्रणव कुमार दास यांनी करजाळे विस्तारत असल्याने महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. कर महसुलातील पारदर्शकतेमुळे अनेकजण नोंदणी करत असल्याचे दास यावेळी म्हणाले.

undefined

Intro:अन भाजपचे आ.राम पाटील रातोळीकर म्हणाले....,
नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चित...!

Body:अन भाजपचे आ.राम पाटील रातोळीकर म्हणाले....,
नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चित...!

नांदेड: राज्यातील व नांदेड जिल्ह्यातील सर्व उमेदवार निश्चित असून ते म्हणजे 'कमळ' आहे. त्यामुळे मुंबई येथे झालेली बैठक ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी घेतली होती. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे. नांदेड लोकसभेचा उमेदवार निश्चिती बाबत नव्हती. जो कोणी उमेदवार असेल 'कमळाचा' असेल अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर इनाडू इंडिया शी बोलताना दिली.
नांदेड जिल्ह्यातील राजकिय परिस्थिती लक्षात घेऊन विधानसभा मतदारसंघ निहाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी खा.रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आ. राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, राजेश पवार, दिलीप कंदकूर्ते, डॉ.संतुक हंबर्डे, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, डॉ.रावसाहेब मोरे आदी उपस्थित होते.
या बैठकीच्या संदर्भाने चर्चा केली असता त्यांनी अनेक विषय उलगडले. यावेळी मुंबई येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत कुठेही उमेदवारी संदर्भात झाली नसल्याचे सांगितले. पाऊण तास झालेल्या चर्चेत संभाव्य उमेदवारीच्या संदर्भात चर्चा न करता भाजपाचा उमेदवार निवडून येण्यासाठी अंग झटकून कामाला लागावे. असा कानमंत्र दिला आहे.
दरम्यान भाजपच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच बूथ प्रमुखांना कामाची जबाबदारी देण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यात बैठक सुरू असल्याचे आ.रातोळीकर यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.