नवी दिल्ली - जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने १२९ कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचा पर्दाफाश केला आहे. बेकायदेशीर सिगरेटची विक्री आणि उत्पादन घेत करचुकवेगिरी केली जात होती. या प्रकरणी जीएसटी अधिकाऱ्याने हरियाणामधून आरोपीला अटक केली आहे.
जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या गुरुग्राम विभागाने करचुकवेगिरीप्रकरणी सत्येंदर शर्मा या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून कोणताही कर, जीएसटी, सेस न भरता आरोपीकडून बेकायदेशीरपणे सिगरेटचे उत्पादन घेतले जात होते. आरोपीने १२९ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे कबुल केले आहे.
हेही वाचा-अदानी कोळसा खाणीला कर्ज दिल्यास एसबीआयमधून गुंतवणूक काढून घेऊ-अमुंडीचा इशारा
जीएसटी गुप्तचर संचालनायाने दिल्ली आणि हरियाणामध्ये छापे टाकले होते. कागदपत्रांची जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने तपासणी केली. तसेच संबंधितांच्या जबाबाची नोंद घेण्यात आली आहे. या तपासणीतून सत्येंद्र शर्मा हा जीएसटी न भरता बेकायदेशीरपणे सिगरेटचे उत्पादन घेण्याच्या रॅकेटमध्ये मुख्य सुत्रधार असल्याचे आढळले आहे. आरोपीला डीजीसीएच्या अधिकाऱ्याने २७ नोव्हेंबरला अटक केली आहे.
हेही वाचा-बाबा रामदेव यांचे बंधु राम भारत होणार रुची सोयाचे एमडी; वार्षिक वेतन अवघा रुपया!