नवी दिल्ली - केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ३९ वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडत आहे. या बैठकीला केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर हेदेखील उपस्थित आहेत.
मोबाईल, खते, हातमागाचे कापड आणि गारमेंट यांच्यावरील वस्तू व सेवा (जीएसटी) कर १८ टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी वाढल्याने उत्पादकांकडील खेळते भांडवल वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, त्यामुळे काही वस्तुंच्या किमती वाढणार आहेत.
हेही वाचा-येस बँकेला वाचविण्याकरता 'या' खासगी बँका करणार कोट्यवधींची गुंतवणूक
काही वस्तुंवर जीएसटी हा ५ टक्के किंवा १२ टक्के लागू आहे. तर कच्चा माल, भांडवली वस्तू अथवा इनपूट सर्व्हिससाठी जीएसटी हा १८ ते २८ टक्के लागू करण्यात येतो. उत्पादकांनी इनपूट क्रेडिट टॅक्सचा दावा केल्यानंतर त्यांना कर परतावा मिळतो. सध्या, प्रति वर्षी २० हजार कोटीपर्यंत इनपूट क्रेडिट टॅक्सचा परतावा देण्यात येतो. यामध्ये बदल करण्याची गरज असल्याचे सूत्राने सांगितले.