नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट वाढत असतानाच जीएसटीत घट झाली आहे. वस्तू आणि कर सेवेचे (जीएसटी) संकलन मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये १ लाख कोटीहून किंचितसे कमी झाले आहे. हे करसंकलन 99 हजार 939 कोटी रुपये एवढे आहे.
मे महिन्यात 1 लाख 289 कोटी जीएसटीचे कर संकलन झाले होते. तर याच महिन्यात गेल्या वर्षी 95 हजार 610 कोटींचे कर संकलन झाले होते. या जीएसटीमध्ये राज्य व केंद्राकडील दोन्ही राज्यांच्या जीएसटीचा समावेश आहे. जीएसटीमध्ये 17 विविध करांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.
असे आहे जुनमधील जीएसटीचे प्रमाण
केंद्राकडील जीएसटी - 18,366 कोटी
राज्यांकडील जीएसटी - 25,343 कोटी
एकत्रित जीएसटी - 47,772 कोटी (आयात शुल्कामधून मिळालेल्या 21, 980 कोटींचा समावेश)
सेस - 8457 कोटी (आयात शुल्कामधून मिळालेल्या 876 कोटींचा समावेश)