नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी छोट्या बचत योजनांचे व्याजदर कमी करण्यात आल्याचा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश चुकून जारी करण्यात आला असून, तो लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे.
या आदेशानुसार सेव्हिंग्ज डिपॉझिट वार्षिक व्याजदर चार टक्क्यांवरुन साडेतीन टक्क्यांवर आणण्यात आला होता. पीपीएफ रेट हा ७.१ टक्क्यांवरुन ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील चौमाही व्याजदर ७.४ टक्क्यावरुन ६.५ टक्क्यांवर आणण्यात आले होते. तसेच एक वर्षीय ठेवीवरील चौमाही व्याजदर ५.५ टक्क्यांवरुन ४.४ टक्के करण्यात करण्यात आले होते. एप्रिलपासून सुरू होत असलेल्या २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी ही कपात लागू होणार होती.
मात्र, आता अर्थमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर व्याजदर जैसे थे राहणार आहेत.
हेही वाचा : महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शिवराज सिंह यांचा निर्णय