नवी दिल्ली - केंद्र सरकार अपघातामधील मृत्युंची संख्या कमी करण्याकरता महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. चारचाकी वाहनांमध्ये पुढील सीटवर बसलेल्या प्रवाशांना एअरबॅग बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव तयार केला आहे.
चारचाकीत एअरबॅग बंधनकारक करण्यामागे प्रवाशांना सुरक्षितता देणे हा हेतू आहे. वाहन चालकाशेजारी एअरबॅगची सुरक्षा मिळाली तर प्रवासी सरक्षित राहू शकतील, असे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा-आरसी बुक, वाहन परवाना नूतणीकरणास मुदतवाढ, मात्र विलंब टाळा
एअरबॅगची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून वाहनांच्या जुन्या मॉडेलमध्ये करण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. तर वाहनांच्या नवीन मॉडेलसाठी १ जून २०२१ पासून एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव वाहतूक मंत्रालयाने तयार केला आहे. या प्रस्तावाचा कच्चा आराखडा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिला आहे. त्यावरील सूचना हे morth@gov.in या वेबसाईटवर ३० दिवसांत पाठविण्याच्या सूचना केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
हेही वाचा-बुलडाणा : रेतीची अवैध वाहतूक करणार्या टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल