नवी दिल्ली - केंद्र सरकारने यंदा खरिपात तांदूळ खरेदीचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढविले आहे. हे प्रमाण ४४९.८३ लाख टन इतके आहे. त्यासाठी केंद्र सरकारने किमान आधारभूत खरेदी किंमत देत ८४,९२८,१० कोटी रुपये खर्च केले आहेत.
चालू असलेल्या वर्ष २०२०-२१ मध्ये खरीप विपणन हंगामात सरकारकडून किमान आधारभूत किमतीने तांदूळ खरेदी करणार आहे. भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) आणि इतर सरकारी संस्थांनी २५ डिसेंबरपर्यंत ४४९.८३ लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. गतवर्षी २५ डिसेंबरपर्यंत ३६०.०९ टन तांदळाची खरेदी झाली होती.
हेही वाचा-वाहन उद्योगात पुढील वर्षी सुधारणा होईल- नोमूराचा अंदाज
सरकारने किमान आधारभूत किमतीने तांदूळ खरेदी केल्याने ५५.४९ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सरकारने ४४९.८३ लाख टन तांदळापैकी २०२.७७ लाख टन तांदूळ एकट्या पंजाबमधून खरेदी केला आहे. पुढील वर्षात खरिपासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, उत्तराखंड, तामिळनाडू, महाराष्ट्र, बिहार, झारखंड आदी राज्यांमधून खरेदी करणार आहे.
हेही वाचा-व्होडाफोन आयडियाकडून ४जी सेवेकरता ३ जी स्पेक्ट्रमचा मुंबईत वापर
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्रात विकासदर घसरला आहे. असे असले तरी कृषी क्षेत्राने वृद्धीदर नोंदविला आहे.