नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वाहन मालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने मोटार वाहनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या वैधतेत ३० जून २०२१ पर्यंत वाढ केली आहे. यामध्ये वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), नोंदणी प्रमाणपत्र आणि परमिट यांचा समावेश आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फिटनेस, परवाना, वाहन परवाना, नोंदणी आणि इतर कागदपत्रांसाठी लागणाऱ्या वैधतेत मुदत वाढ केली आहे. १ फेब्रुवारी २०२० पासून किंवा ३१ मार्च २०२१ पूर्वी ज्यांच्या कागदपत्रांच्या वैधतेची मुदत संपत आहे, अशा वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यांची कागदपत्रे ३० जून २०२१ पर्यंत वैध ग्राह्य धरावीत, असे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा-बंद किंवा खासगीकरण...एअर इंडियापुढे दुसरा पर्याय नाही!
राज्य सरकारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे
यापूर्वी केंद्र सरकारने ३० मार्च २०२०, ९ जून २०२०, २४ ऑगस्ट २०२० आणि २७ डिसेंबर २०२० ला मोटर वाहनांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या वैधतेत वाढ केली होती. मोटार वाहनांच्या कागदपत्रांच्या वैधतेसाठी ही शेवटची मुदतवाढ असेल, असे संकतेही मंत्रालयाने मार्गदर्शक सूचनामध्ये दिले आहेत. राज्य सरकारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आहे.
हेही वाचा-सोने १४७ रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरात १,०३६ रुपयांची वाढ