नवी दिल्ली - केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीकरिता जीएसटी वार्षिक परतावा ( GST annual returns date extend ) भरण्यासाठी व्यावसायिकांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना जीएसटी वार्षिक परतावा 28 फेब्रुवारीपर्यंत ( FORM GSTR 9 last date ) भरता येणार आहे.
फॉर्म-जीएसटी- 9 आणि फॉर्म-जीएसटी-9 सी हा आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भरण्याकरिता 31 डिसेंबर ही अखरेची मुदत होती. ही मुदत वाढवून 28 फेब्रुवारी ( GST annual return filing deadline till Feb 28 ) करण्यात आल्याचे ट्विट केंद्रीय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (सीबीआयसी) विभागाने ( CBIC tweet on extend date ) केले आहे. जीएसटीआर 9 हा वस्तू आणि सेवा कर भरणाऱ्या व्यावसायिकांकडून दरवरर्षी भरण्यात येतो. त्यामध्ये वस्तू खरेदी आणि विक्रीसह विविध करांचा समावेश होते.
जीएसटी वार्षिक परताव्याकरिता असतात दोन फॉर्म
2 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना जीएसटी वार्षिक परतावा ( GSTR 9 ) भरणे बंधनकारक असते. तर ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 कोटी रुपयांहून अधिक असते, त्यांना जीएसटीआर 9 सी ( GSTR 9C ) भरणे बंधनकारक असते.
हेही वाचा-South Kashmir Encounter : लष्कराची मोहीम फत्ते! 6 दशतवाद्यांचा खात्मा
सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या अडचणींमुळे केंद्र सरकारने मुदत वाढवली होती. आता आयकरदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचा आयटीआर भरावा लागेल, जेणेकरून दंड टाळता येईल.