नवी दिल्ली - टाळेबंदीमुळे लहान मुलांसह सर्वांनाच घरात थांबावे लागत आहे. अशा काळात लहान मुलांना घरी बसून शिकण्यासाठी गुगलने प्ले स्टोअरवर 'किड्स' हा नवा विभाग सुरू करणार आहे. यामध्ये शिक्षकांनी निवडलेले अॅप दिसणार आहेत.
गुगल प्लेने 'किड्स'चा पर्याय उपलब्ध करून दिल्याचे ट्विट केले आहे. लहान मुलांकरता शैक्षणिक, नवनिर्माणक्षमता, कल्पकता असे विविध अॅप दिसणार आहेत.
हेही वाचा-कौतुकास्पद! कोरोनाच्या संकटात एअर इंडियाची 'अशी' आहे कामगिरी
-
Find 👩🏻🏫 teacher-approved ✅ apps and games for kids 👫, all in one place! Navigate to the Kids tab on Google Play to access today! https://t.co/ILKjkPjwxH pic.twitter.com/3rq2v5dxSo
— Google Play (@GooglePlay) April 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Find 👩🏻🏫 teacher-approved ✅ apps and games for kids 👫, all in one place! Navigate to the Kids tab on Google Play to access today! https://t.co/ILKjkPjwxH pic.twitter.com/3rq2v5dxSo
— Google Play (@GooglePlay) April 16, 2020Find 👩🏻🏫 teacher-approved ✅ apps and games for kids 👫, all in one place! Navigate to the Kids tab on Google Play to access today! https://t.co/ILKjkPjwxH pic.twitter.com/3rq2v5dxSo
— Google Play (@GooglePlay) April 16, 2020
चांगल्या दर्जाच्या अॅपसाठी शिक्षकांकडून रेटिंग देण्यात येणार असल्याचे गुगल प्लेचे उत्पादन व्यवस्थापक मायकल वॅटसन यांनी म्हटले आहे. ही सुविधा सध्या केवळ अमेरिकेत उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यांत जगभरात सुरू होणार आहे. ही सुविधा लाँच झाल्यानंतर शिक्षकांनी संमत केलेले सुमारे १ हजार अॅप वापरकर्त्यांना दिसणार आहेत.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून पॅरासिटिमॉलपासून तयार केलेल्या संमिश्रांच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द