पॅरिस - गुगलला फ्रान्समधील माध्यम कंपनीशी पंगा घेणे महागात पडले आहे. फ्रान्समधील माध्यम कंपनीबरोबरील वादात फ्रान्स सरकारच्या स्पर्धा नियंत्रक संस्थेने गुगलला 59.2 कोटी डॉलर (सुमारे 4,100) कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
फ्रान्स सरकारच्या स्पर्धा नियंत्रक संस्थेने गुगलला रोज 10 लाख डॉलरचा दंड ठोठावू, असा इशाराही दिला आहे. हा दंड टाळण्यासाठी गुगलने माध्यम कंपन्यांना कशा पद्धतीने मोबदला दिला जाईल, याचा प्रस्ताव दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश स्पर्धा नियंत्रक संस्थेने दिले आहेत.
हेही वाचा-विकृतीचा कळस, 40 वर्षीय महिलेवर बलात्कार
गुगल फ्रान्सकडून तीव्र निराशा व्यक्त
स्पर्धा नियंत्रक संस्थेच्या निकालाबाबत गुगल फ्रान्सने तीव्र निराशा व्यक्त केली आहे. बातम्यांमधील मजकूर हा प्रत्यक्षात प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे निकालात प्रयत्न दिसून आले नाहीत, असे गुगल फ्रान्सने म्हटले आहे. तोडगा काढण्यासाठी चांगल्या उद्देशाने तडजोड करण्यात येत आहे. त्यासाठी काही माध्यमांबरोबर एका करारापर्यंत पोहोचत आहोत.
युरोपियन युनियनकडून माध्यमांतील मजकुरांबाबत प्रसिद्धी कंपन्यांना गुगलसह तंत्रज्ञान कंपन्यांनी मोबदला द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुगल आणि फ्रान्समधील स्पर्धा नियंत्रक संस्थेमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वी स्पर्धा नियंत्रक संस्थेने गुगलला माध्यम कंपन्यांनासह इतर संस्थांशी तीन महिन्यांत चर्चा करण्याचे अंतरिम आदेश दिले होते. गुगलकडून बाजारपेठेत वर्चस्व तयार करण्यासाठी अनुचित पद्धतींचा वापर होत असल्याचा फ्रान्ससह युरोपियन युनियन अँटीट्रस्ट ऑथिरिटीकडून वारंवार आरोप करण्यात येत आहे.
अमेरिकेने युट्युबला ठोठावला होता दंड-
इंटरनेट कंपन्यांकडून वैयक्तिक गोपनीयतेचा भंग झाल्यास अमेरिकेत मोठा आर्थिक दंड करण्याची कायदेशीर तरतूद आहे. याच कायद्याचा बडगा युट्यूबची मालकी असलेल्या गुगलला बसला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने १ हजार ते १४०० कोटींचा दंड (१५० ते २०० दशलक्ष डॉलर) दंड ठोठावला होता. अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापारी आयोगाने (एफटीसी) तोडगा म्हणून गुगलला १ हजार ते १४०० कोटींचा दंड निश्चित केला आहे. या दंडाला अमेरिकेच्या न्याय विभागाची मंजुरी लागणार आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लहान मुलांच्या माहितीच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणीचा सर्वात मोठा दंड ठरणार आहे. गुगलने १३ वर्षापर्यंतच्या मुलांच्या माहिती घेवून गोपनयीतेचा भंग केल्याचा आरोप युट्युबविरोधात करण्यात आला होता.