ETV Bharat / business

साखर कारखान्यांसाठी 'सुगीचा हंगाम', चढे दर असताना निर्यातीची संधी

author img

By

Published : Feb 17, 2020, 3:49 PM IST

सध्या, देशात साखरेचा अतिरिक्त साठा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांना निर्यात करणे सुलभ झाले आहे.

Sugar mill
साखर कारखाना

नवी दिल्ली - अतिरिक्त साठा असल्याने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांसाठी आगामी तीन महिन्यात सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे असताना निर्यात करता येणार आहे. त्यानंतर मात्र, साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्राझीलकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

सध्या, देशात साखरेचा अतिरिक्त साठा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे साखरेच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखान्यांना निर्यात करणे सुलभ झाले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी तीन ते चार महिने हे साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचे आहेत. या दरम्यान साखर निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होणार आहे. कारण तीन-चार महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलची साखर पोहोचणार आहे.

इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनचे (आयएसईसी) व्यवस्थापकीय संचालक अधीर झा म्हणाले, ब्राझील येत्या काळात इथॉनॉलहून अधिक साखरेचे उत्पादन घेण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढणार आहेत. ब्राझीलला इथेनॉलपेक्षा साखरेचे उत्पादन अधिक फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा-एलआयसीचा हिस्सा विकून 'एवढे' कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा

दोन वर्षांपूर्वी ब्राझीलकडून जगात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेण्यात येत होते. मात्र, साखरेच्या किमती घसरल्यानंतर ब्राझीलने इथेनॉलचे अधिक उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गेली दोन वर्षे भारत हा साखरेचे उत्पादन घेणारा क्रमांक एकचा देश आहे. वर्ष २०१७ नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती सर्वाधिक आहेत.

हेही वाचा-सोन्याच्या आयातीत एप्रिल-जानेवारीत ९ टक्क्यांची घसरण

सध्या, खनिज तेलाच्या किमती उतरल्या आहेत. तर साखरेचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत नव्या हंगामात ब्राझीलकडून साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, भारत साखर निर्यातीचे ६९ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. सध्या भारताकडे साखरेचा अतिरिक्त साठा आहे. तर ब्राझीलकडे साखरेचा अतिरिक्त साठा नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.