नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ६९ रुपयांनी वाढून ४६,४०८ रुपये झाले आहेत. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने देशातही दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,३३९ रुपये तोळा होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही वधारले आहेत. चांदीचा दर प्रति किलो २५१ रुपयांनी वाढून ६९,०३५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,७८४ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,७९३ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.६० डॉलर आहेत.
हेही वाचा-महाधिवक्ता पदावरून तुषार मेहता यांना काढा; तृणमुलच्या खासदरांची राष्ट्रपतींकडे मागणी
काय आहे बाजार विश्लेषकांचे मत?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) म्हणाले, की डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने खरेदीला चालना मिळाली आहे. मोतीलाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले, की कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे भीती वाढली आहे. दुसरीकडे डॉलरचे मूल्य घसरत आहे. अशा स्थितीत सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
हेही वाचा-शक्ती भोग आटा कंपनीकडून ३,२६९ कोटी रुपयांची फसवणूक; ईडीकडून एमडीला अटक
मागील आठवड्यात सोमवारी असा होता सोने-चांदीचा दर
दिल्लीत सोन्याचे दर प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये होते. तर त्यामागील मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर सोमवारी वधारले होते. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून सोमारी ६६,८५४ रुपये होते.