नवी दिल्ली - व्यापारी तूट आणि कच्च्या तेलाचे दर याचे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हान आहे. अशा स्थितीत सोन्याच्या आयातीत एप्रिलमध्ये ५४ टक्के वाढ झाल्याची चिंताजनक बाब समोर झाली आहे. एप्रिलमध्ये 397 कोटी डॉलरच्या सोन्याची आयात झाली आहे.
एप्रिलमध्ये २५८ कोटी डॉलर मुल्याच्या मौल्यवान धातुची आयात झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. सोन्याची आयात वाढल्याने गेल्या पाच महिन्यात एप्रिलमध्ये व्यापारी तूट सर्वाधिक होवून ती १ हजार ५३३ कोटी डॉलर एवढी झाली आहे. सध्या देशातील चालू खात्यातील वित्तीय तूट (सीएडी) ही वाढून जीडीपीच्या २.५ टक्के झाली आहे. गतवर्षी ही तूट जीडीपीच्या २.१ टक्के होती. फेब्रुवारीमध्ये सोन्याची आयात कमी झाली होती. त्यानंतर सोन्याच्या आयातीचे प्रमाण वाढत गेले आहे.
मार्चमध्ये सोन्याची आयात ३१ टक्क्याने वाढून ३२७ कोटी डॉलर एवढी झाली होती. भारत हा जगात सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश आहे. ज्वेलरी उद्योगासाठी हे सोने बहुतांश आयात केले जाते. देशात वर्षाला ८०० ते ९०० टन सोने आयात केले जाते.