ETV Bharat / business

चांदी प्रति किलो ३९७ रुपयांनी महाग; जाणून घ्या सोन्याचे दर - चांदी दर न्यूज

मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,७०८ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १,८०६ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २६.६३ डॉलर आहे.

gold rate news
सोने दर न्यूज
author img

By

Published : Jul 6, 2021, 6:37 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ३८९ रुपयांनी वाढून ४६,७६२ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने देशातही सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,३७३ रुपये होता.

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ३९७ रुपयांनी वाढून ६९,१०५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,७०८ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वाढून प्रति औंस १,८०६ डॉलर आहे. तर चांदीचा दर स्थिर राहून प्रति औंस २६.६३ डॉलर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे मूल्य डॉलरच्या तुलनेत घसरले आहेत. त्यामुळे सोने खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाचा ८ जुलैला विस्तार होणार- सुत्रांची माहिती

मागील आठवड्यात मंगळवारी असे होते सोने-चांदीचे दर

सोन्याचे दर मंगळवारी दिल्लीत प्रति तोळा ९९ रुपयांनी कमी होऊन ४६,१६७ रुपये राहिले होते. चांदीचे दर प्रति किलो २२२ रुपयांनी घसरून ६७,९२६ रुपये राहिले होते.

हेही वाचा-गुजरातमध्ये महामार्गावर मुक्तसंचार करताना दिसले ५ सिंह, व्हिडिओ व्हायरल

कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचारासाठी झाली मदत -
सोन्यात गुंतवणुकीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे ते उत्तम परतावा तर देते. त्याचबरोबरअर्ध्यारात्री सराफाकडे जाऊन मोड करून रोख रक्कम मिळवता येते. अडचणीच्या काळात ही मदत महत्वाची ठरत आहे. याचा प्रत्यय रुग्णांच्या नातेवाईकांना आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावेळी अनेक नातेवाईकांनी सोन्याचा पर्याय निवडला, काहींनी सोने विकून तर काहींनी सोने गहाण ठेऊन आर्थिक अडचण भागवली. यासोबतच काहींनी घराचे हप्ते, गाडीचे हप्ते, घरभाडे भरण्यासाठी सुद्धा सोन्याची मोड केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.