जम्मू - जम्मू आणि काश्मीरच्या प्रशासनाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १२ ऑक्टोबरपासून श्रीनगरमध्ये सुरू होणार आहे.
परिषदेमध्ये जम्मू आणि काश्मीरची बलस्थाने, रणनीती आणि क्षमता दाखविण्यात येणार असल्याचे औद्योगिक विभागाचे मुख्य सचिव नवीन चौधरी यांनी माध्यमांना सांगितले. तसेच उद्योगजकांना येथे गुंतवणुकीची संधीही मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचे ३७० कलम काढल्यानंतर केंद्र सरकारने तिथे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.