ETV Bharat / business

अदानी कोळसा खाणीला कर्ज दिल्यास एसबीआयमधून गुंतवणूक काढून घेऊ-अमुंडीचा इशारा - Adanis Carmichael coal mine

स्टेट बँकेला कर्ज देण्यात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळविले आहे. सध्या, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहोत, असे अमुंडी कंपनीने म्हटले आहे.

अदानी प्रकल्पाला विरोध
अदानी प्रकल्पाला विरोध
author img

By

Published : Nov 28, 2020, 7:46 PM IST

नवी दिल्ली - फ्रान्सची कंपनी अमुंडीने अदानी कोळसा खाणीवरून स्टेट बँक ऑफ इंडियाला गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला ५ हजार कोटींचे कर्ज देवू, नये, असे अमुंडी कंपनीने स्पष्ट म्हटले आहे.

डायरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूशनल कॉर्पोरेट क्लाईंट डिव्हीज आणि ईएसजीचे जीन जेकस बार्बरीस म्हणाले, की स्टेट बँकेने अदानी कोळसा प्रकल्पाला कर्ज देवू नये, असे वाटते. जर त्यांनी कर्ज दिले तर आम्ही तत्काळ गुंतवणूक काढून घेवू, असा त्यांनी इशारा दिला आहे. पुढे ते म्हणाले, की कोळसा खाणींना कर्ज देणे हे पूर्णपणे विसंगत आहे. कारण एसबीआयमधील ग्रीन बाँडमध्ये गुंतणूक झाली आहे. स्टेट बँकेला कर्ज देण्यात सहभागी होऊ नये, असे त्यांना कळविले आहे. सध्या, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहणार आहोत.

हेही वाचा-वैज्ञानिक संशोधनातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी बांधील - भारत बायोटेक

पर्यावरणाच्या समस्येवरून कोळसा खाणीला विरोध-

दरम्यान, एसबीआयकडून ऑस्ट्रेलियामधील अदानी कॅरमीशियेल औष्णिक कोळसा खाणीसाठी कर्ज देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कार्बनचे उत्सर्जन वाढणार असल्याने यापूर्वीच पर्यावरणप्रेमींनी कोळसा प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. जागतिक महामारी आणि हवामाची गंभीर समस्या असताना अदानी कोळसा खाणीला कर्ज मंजूर करणे ही खूप मोठी जोखीम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमुंडी ही युरोपमधील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक (असेट मॅनेजर) कंपनी आहे. या कंपनीचा मालमत्ता व्यवस्थापनात जगातील पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.