ETV Bharat / business

विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले २८८१ कोटी रुपये; भांडवली बाजाराला फटका

author img

By

Published : Aug 4, 2019, 2:06 PM IST

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान २ हजार ९८५.८८ कोटी भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत.

चिंतेमधील गुंतवणूकदार

नवी दिल्ली - विदेशी गुंतवणूकदारांनी दोन दिवसात मोठ्या प्रमाणात शेअरची विक्री केल्याने भांडवली बाजाराला मोठा फटका बसला आहे. गुंतवणणूकदारांनी २ हजार ८८१ कोटी रुपये भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान २ हजार ९८५.८८ कोटी भांडवली बाजारामधून काढून घेतले आहेत. चीन-अमेरिकेमध्ये पुन्हा व्यापारी युद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढल्याचे ग्रोचे सीओओ हर्ष जैन यांनी सांगितले. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याची घोषणा केल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. जानेवारीपासून विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी धडाक्यात केली होती.

अशी शेअरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली खरेदी

महिना शेअर खरेदी (कोटीमध्ये)
जून १० हजार ३८४.५४ कोटी
मे ९ हजार ०३१.१५ कोटी
एप्रिल १६ हजार ०९३ कोटी
मार्च ४५ हजार ९८१ कोटी
फेब्रुवारी ११ हजार १८२ कोटी

धार्मिक न्यास म्हणून नोंदणी केलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांवरील करात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामधून निधी काढून देण्यावर भर दिला. याशिवाय मंदावलेली अर्थव्यवस्था आणि असमाधानकारक मान्सून याचाही गुंतवणूकीवर परिणाम झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.