ETV Bharat / business

कोरोनाचा व्यापारावर होणार परिणाम; केंद्रीय अर्थमंत्री उद्योगांच्या प्रतिनिधींची घेणार भेट - कोरोना परिणाम

कोरोनाचा इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, मोबाईल अशा विविध क्षेत्रावर परिणाम होत आहे. चीनमधून भारतात विविध उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात करण्यात येते. विशेषत: वुहान शहरामधून स्मार्टफोनसाठी लागणारे सुट्टे भाग, वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची आयात करण्यात येते.

Nirmala Sitaraman
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Feb 15, 2020, 1:20 PM IST

Updated : Feb 15, 2020, 1:30 PM IST

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील स्मार्टफोन, वाहन क्षेत्र, औषधी उत्पादन अशा विविध क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी भेट घेणार आहेत. कोरोनाचा व्यापार आणि उद्योगावर काय परिणाम होणार आहे, हे निर्मला सीतारामन जाणून घेणार आहेत.

कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आकलन करून घेणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, चीनमध्ये कोरोनाचा सध्या संसर्ग सुरू आहे. त्याचा भारतीय उद्योग आणि व्यापारावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी सचिवांसह केंद्रीय अर्थमंत्री उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

संबंधित बातमी -चीनच्या कोरोनाने भारतीय उद्योगांची 'दमछाक', पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम

कोरोनाचा इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, मोबाईल अशा विविध क्षेत्रावर परिणाम होत आहे. चीनमधून भारतात विविध उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात करण्यात येते. विशेषत: वुहान शहरामधून स्मार्टफोनसाठी लागणारे सुट्टे भाग, वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची आयात करण्यात येते. कोरोनामुळे वुहानमधील सर्व उद्योग ठप्प झाले आहेत.

संबंधित बातमी वाचा-ऑटोहब वुहानला कोरोनाचा फटका; भारतीय वाहन उद्योगाची वाढली चिंता

कोरोना चीनमध्ये पसरल्याने सुमारे १,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ६० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधून जवळपास भारतासह २५ देशांमध्ये कोरोना पसरला आहे.

Last Updated : Feb 15, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.