ETV Bharat / business

आधार-पॅनकार्ड लिंक नसेल तर घाबरू नका; प्राप्तिकर विभागाने दिली मुदतवाढ

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आजतागायत दहाहून अधिक वेळा आधार व पॅनकार्ड जोडण्याची मुदत वाढवली आहे. यासंबधीची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटरद्वारे दिली आहे.

aadhaar pan linking date
आधार पॅनकार्ड लिंक
author img

By

Published : Mar 31, 2021, 8:38 PM IST

Updated : Apr 1, 2021, 12:25 AM IST

नवी दिल्ली - जर तुम्ही आधार कार्ड हे पॅनबरोबर जोडले (लिंक) केले नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता 30 जून 2021 पर्यंत नागरिकांना आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येणार आहे. 31 मार्च 2021 ही आधार व पॅन कार्ड लिंक करण्याची आज शेवटची तारीख होती.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आजतागायत दहाहून अधिक वेळा आधार व पॅनकार्ड जोडण्याची मुदत वाढवली आहे. आजही मुदतवाढ दिल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटरद्वारे दिली आहे.

income tax department tweet
प्राप्तिकर विभागाचे ट्विट

2018 मधील सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड योजना संवैधानिकदृष्ट्या वैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे पॅन कार्ड हे आधारला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हेही वाचा-सरत्या आर्थिक वर्षात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण 90.82 लाख कोटी रुपयांची वाढ

प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी पॅनकार्ड हे आधारला जोडणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

अशी करा पॅनची आधारला जोडणी

  • 567678 किंवा 56161 या क्रमांकावर UIDPAN<स्पेस>12 अंकी आधार क्रमांक><स्पेस>10 अंकी पॅन क्रमांक> असा संदेश पाठवा.
  • www.incometaxindiaefiling.gov.in. या ई-फायलिंग वेबसाईटवरूनही जोडणी करू शकता.

हेही वाचा-फेसबुकसह गुगल समुद्रमार्गे इंटरनेट केबलचा करणार विस्तार

आधार-पॅन कार्ड लिंक नाही केले तर भरावा लागू शकतो मोठा दंड-

जर आधार हे पॅन कार्डला जोडले नाही तर पॅन कार्ड हे चालू नसल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. तसेच टीडीएसच्या दरावरही परिणाम होणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. पॅन कार्ड हे आधार कार्डला जोडले नसल्याने आयटीआर भरता येणार आहे. त्यामुळे करदात्यांना 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो.

Last Updated : Apr 1, 2021, 12:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.