ETV Bharat / business

फिल्मसिटीची पाच वर्षात ७.५५ कोटींची कमाई, भेट देणाऱ्यांच्या संख्येत वाढ

२०१५-१६ मध्ये फिल्मसिटीला दर महिन्याला सरासरी ४ हजार २६९ जण भेट होते. हे प्रमाण वाढून चालू वर्षात दर महिन्याला सरासरी ८ हजार ७७५ लोक फिल्मसिटीला भेट देत आहेत.

author img

By

Published : Jul 14, 2019, 4:54 PM IST

फिल्मसिटी

मुंबई - मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील फिल्मसिटीचे अनेक जणांना आकर्षण असते. या फिल्मसिटीने गेल्या पाच वर्षात प्रवेश शुल्कातून ७.५५ कोटी रुपये कमविले आहेत. तर ९.२९ लाख रुपये फिल्मसिटीत विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांकडून वसूल केले आहेत. ही फिल्मसिटी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाकडून (एमएफएससीडीसीएल) चालविण्यतात येते.

राज्य सरकारने १९७७ मध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीच काम पूर्ण केले. यामध्ये चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी ४२ ठिकाणे आहेत. एप्रिल २०१४ ते एप्रिल २०१९ दरम्यान २.९३ लाख लाख लोकांनी फिल्मसिटीला भेट दिली. ही फिल्मसिटी गोरेगावमधील आरे कॉलनीमधील ५२० एकरामध्ये आहे.

असे आहे प्रवेश शुल्क-
भारतीयांसाठी ६०० रुपये तर विदेशी नागरिकांसाठी ३ हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. विद्यार्थ्यांना केवळ ३५० रुपये शुल्क भरावे लागते.

२०१५-१६ मध्ये फिल्मसिटीला दर महिन्याला सरासरी ४ हजार २६९ जण भेट होते. हे प्रमाण वाढून चालू वर्षात दर महिन्याला सरासरी ८ हजार ७७५ लोक फिल्मसिटीला भेट देत आहेत.

फिल्मसिटीचा होणार कायापालट-

फिल्मसिटीचा कायापालट झाल्यानंतर येथे जागतिक दर्जाची सुविधा निर्माण होणार असल्याचे फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी सांगितले. त्यासाठी २ हजार ६०० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. फिल्मसिटीच्या नव्या कायापालट योजनेमध्ये इनडोअर आणि आऊटडोअर लोकेशनची संख्या वाढविणे, म्यूझिअम, थिम पार्क्स, निर्मितीनंतर अधिक सुविधा देणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.