ETV Bharat / business

'आगामी सण हे वाहन उद्योगासाठी निर्णायक ठरणार' - Goods and Services Tax

गेल्या १२ महिन्यात वाहन उद्योगात मंदी दिसून आली आहे. मात्र सरकारने आर्थिक सुधारणा केल्यापासून ६ जूलैपासून अर्थव्यवस्था बदलली आहे. मंदावलेली स्थिती जावून सकारात्मकता येत असल्याचे गोयंका यांनी माध्यमांना सांगितले.

संग्रहित- कार
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:44 PM IST

इंदूर - महिंद्रा अँड महिंद्राचे (एम अँड एम) व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी वाहन उद्योगात सुधारणा होत असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. आगामी सण उद्योगासाठी निर्णायक ठरणार असल्याचेही गोयंका यांनी म्हटले आहे.

पवन गोयंका म्हणाले, गेल्या १२ महिन्यात वाहन उद्योगात मंदी दिसून आली आहे. मात्र सरकारने आर्थिक सुधारणा केल्यापासून ६ जूलैपासून अर्थव्यवस्था बदलली आहे. मंदावलेली स्थिती जावून सकारात्मकता येत असल्याचे गोयंका यांनी माध्यमांना सांगितले. पुढे ते म्हणाले, बँकांच्या वित्तीय पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. तसेच देशाच्या बहुतेक भागात चांगले पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे नवरात्रपासून वाहन उद्योगाच्या बाजारपेठेत सुधारणा होईल, अशी आशा आहे.

नवरात्रपासून सहा आठवड्याचा उत्सव सुरू होत आहे. जर विक्री ही प्रोत्साहनात्मक राहिली तर वाहन उद्योग खूप वेगाने यश मिळवेल, असेही गोयंका म्हणाले.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी सवलत १ ऑक्टोबरपासून बंद

वाहन उद्योगाच्या जीएसटी कपातीच्या मागणीबाबत गोयंका म्हणाले, आम्हाला मागणी करणे खूप सोपे आहे. मात्र सरकारला वित्तीय स्थिती स्थिर ठेवावी लागते. सरकारने कमी काळात कॉर्पोरेट कर कमी केला आहे. त्यामुळे वाहन उद्योगात आनंद आहे. कॉर्पोरेट कर कमी होईल, अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. लोकांची नवीन कार घेण्याची इच्छा कमी झालेली नाही. मात्र, अवजड ट्रकची विक्री कमी झाल्याने काहीशी चिंता असल्याचे त्यांनी सांगितले. एम अँड एमने मध्यप्रदेशमधील पिथामपूर येथून इलेक्ट्रिक दुचाकीची युरोपमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा एवढी आहे संपत्ती

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.