ETV Bharat / business

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक

author img

By

Published : May 27, 2020, 12:21 PM IST

समाज माध्यमांमध्ये कंपन्यांची बनावट वेबसाईटची लिंक व्हायरल करून त्याद्वारे नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. बाजारात ई-कॉमर्सच्या माध्यमातून बनावट वेबसाईट बनविली जाते. त्याद्वारे ब्रँडेड व महाग वस्तूंवर 50 ते 60 टक्के सवलत दाखवून लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत.

सायबर गुन्हेगार
सायबर गुन्हेगार

मुंबई - टाळेबंदीच्या काळात तुम्ही घरबसल्या ऑनलाईन खरेदी करणार असाल तर, ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ब्रँडेड व महागडे पेन खरेदीवर सूट दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. यावर सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

बनावट ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमधून होतेय फसवणूक

समाज माध्यमांमध्ये कंपन्यांची बनावट वेबसाईटची लिंक व्हायरल करून त्याद्वारे नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. बाजारात ई-कॉमर्सच्या माध्यमातून बनावट वेबसाईट बनविली जाते. त्याद्वारे ब्रँडेड व महाग वस्तूंवर 50 ते 60 टक्के सवलत दाखवून लुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. मॉँट ब्लँक या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या सोशल माध्यमांवर बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या काळात सूट दिल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे. ग्राहकांनी बनावट वेबसाईटवरून खरेदी करू नये, असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.

मॉँट ब्लँक या एका पेनची किंमत भारतात 25 हजारांपासून पुढे आहे. मात्र, बनावट वेबसाईटमध्ये या पेनवर 20 ते 60 टक्के सूट दिली जात असल्याची खोटी जाहिरात दिली जात आहे. प्रत्यक्षात मॉँट ब्लँक ( Mont blanck ) या आंतरराष्ट्रीय कंपनीचे भारतातील अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक ( Tata Cliq ) आहेत .

ही आहेत बनावट वेबसाईटची नावे

  • https://montblancsindia.com
  • https://montblancindias.com
  • https://montblancindia.org
  • https://montblancindia.co

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे 'असे' करा नियोजन

टाळेबंदीच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. सध्या मॉँट ब्लँक नावाच्या नकली वेबसाईट संदर्भात आर्थिक फसवणूकीच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत. त्या नकली वेबसाईटपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

सायबर पोलिसांची कारवाई; ४१९ गुन्हे दाखल

  • राज्यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १७५ गुन्हे दाखल झाले आहेत.
  • आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
  • टिक टॉक विडिओ शेअरप्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत.
  • ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत.
  • इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.
  • ओडियो क्लिप्स, यु ट्यूबचा गैरवापर केल्याप्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे .

हेही वाचा-महामारीने स्टार्टअप कंपन्यांचे मोडले कंबरडे; 'कारदेखो'कडून कर्मचारी कपात

सायबर तज्ञ अंकुर पुराणिक म्हणाले, की रोज ऑनलाईन फसवणूकीचे नवीन प्रकार समोर येत आहे. त्या बनावट वेबसाईटमधून डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा इंटरनेटचे युझरनेम आणि पासवर्ड घेण्याचा प्रकार आहे. पुराणिक यांनी सुरक्षित खरेदी करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

  • ग्राहकांनी मोठ्या सवलतीच्या आमिषाने खरेदीकडे आकर्षित होवू नये.
  • ग्राहकांनी विश्वासू वेबसाईटवरूनच खरेदी करावी.
  • जर बनावट वेबसाईटवरून खरेदी केली तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.
  • वेबसाईटवर पासर्वड विचारत असताना ब्राऊझर कुलुपाचे हिरवे चिन्ह आहे, हे पाहा. ते असेल तर विश्वासू साईट आहे.
  • ओटीपी न येता थेट आर्थिक व्यवहार होत असेल तर त्या वेबसाईटवरून फसवणूक होवू शकते.
  • ऑनलाईन व्यवहार करताना इतर सर्व अॅप आणि विंडोज बंद करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.