नवी दिल्ली - देशात चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होत असताना फेसबुकने द्वेषमूलक पोस्टबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या काळात चुकीची माहिती किंवा अफवा पसवू नये, यासाठी फेसबुककडून काळजी घेण्यात येणार आहे.
जे फेसबुकच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करतात, त्यांच्या पोस्ट कमीत कमी दिसतील याचे फेसबुककडून नियोजन करण्यात येत आहे. ही माहिती फेसबुकने ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. काही ठिकाणी द्वेषमूलक भाषणे आहेत. त्यामधून ऑफलाईन हानी होऊ शकते. अशा अडचणीत असणारा मजकूर व्हायरल निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये कमी दिसणार आहे. अशा मजकुरांमधून निवडणुकीच्या तोंडावर हिंसाचार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तंत्रज्ञानामधून खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या पोस्ट नियमांचे उल्लंघन करतील, त्या हटविण्यात येणार आहेत.
हेही वाचा-जीएसटी मोबदल्यापोटी केंद्राकडून राज्यांना 30 हजार कोटी वितरीत
फेसबुकसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ
भारत ही फेसबुक, इन्स्टा आणि व्हॉट्सअप या कंपन्यांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार देशात व्हॉट्सअपचे ५३ कोटी वापरकर्ते आहेत. तर फेसबुकचे ४१ कोटी वापरकर्ते आणि इन्स्टाग्रामचे २१ कोटी वापरकर्ते आहेत. फेसबुकने द्वेषमूलक पोस्ट शोधून काढण्यासाठी तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना नेटबँकिंगसह मोबाईल अॅप वापरताना अडचणी