नवी दिल्ली – राज्य कर्मचारी विमा महामंडळाने (ईएसआयसी) महामारीमुळे नोकरी गमाविलेल्या बेरोजगारांना मिळणाऱ्या तीन महिन्यांच्या वेतनाच्या सरासरी 50 टक्के भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी असणारे नियम शिथिल केले आहेत. 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोकऱ्या गमाविणाऱ्यांना हा भत्ता मिळणार आहे.
ईसआयसीची 182 वी बैठक गुरुवारी केंद्रीय कामगार मंत्री तथा ईएसआयसीचे चेअरमन संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. या बैठकीत बेरोजगारांना मिळणाऱ्यांसाठी नियम शिथील केल्याने औद्योगिक कंपन्यांमधील 40 लाख कामगारांना लाभ होणार आहे. ईएसआयसीने बेरोजगारांना भत्ता देण्याच्या नियमात पात्रतामधील बदल आणि भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय अटल बिहारी व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत घेतला आहे. ईएसआयसीने ही शिथीलतेची मुदत 30 जून 2021 पर्यंत लागू केली आहे.
कोरोना महामारीमुळे नोकऱ्या गमाविलेल्या कामगारांना दिलासा देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना पूर्वीच्या अटीनुसार 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 ला सुरू होणार आहे.
यापूर्वी सरासरी भत्त्यांच्या 25 टक्के भत्ता हा मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये वाढ करून 50 टक्के भत्त्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. बेरोजगारीनंतर तीन महिन्याने मिळणारी रक्कम ही 30 दिवसानंतर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिवसांची होती. त्यासाठी कामगारांना थेट ईएसआयसी कार्यालयामध्ये दावे दाखल करता येणार आहेत. यापूर्वी असे दावे कंपनीकडून दाखल करण्यात येत होते. त्यासाठी कर्मचाऱ्याने कंपनीत किमान 2 वर्षे काम केलेले असावे.