नवी दिल्ली - सरकारी बँकांची कॉर्पोरेट कंपन्यांकडून फसवणूक सुरुच आहे. फसवणुकीमुळे ईडीने शक्ती भोग फूड्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार हे अडचणीत सापडले आहेत. त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोमवारी अटक केली आहे.
ईडीच्या माहितीनुसार शक्ती भोग फूड्सदिल्ली आणि हरियाणामधील केवल कृष्णन यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहे. सीबीआयने कुमार आणि इतरांविरोधात गुन्हेगारीचा कट, फसवणूक आणि फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपत्रावरून ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कात्री न मिळाल्याने थेट हाताने रिबिन तोडली
कुमार यांनी कर्जाची रक्कम बेकायदेशीरपणे वळवून इतर बँक खात्यांवर वळविल्याचा दावा करण्यात येत आहे. सीबीआयने शक्ती भोग आटा कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियासह १० बँकांची ३,२६९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा आहे.
हेही वाचा-'पप्पा, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
नफ्यातील कंपनी अचानक तोट्यात!
स्टेट बँकेने शक्ती भोग फूड्सचे संचालक केवल कृष्णन कुमार आणि इतर संचालक सिद्धार्थ कुमार आणि सुनंदा कुमार यांच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. २४ वर्षे जुनी असलेली कंपनी गहू, पीठ, तांदूळ, बिस्किट्स, कुकीज आदी व्यवसायात आहेत. २००८ मध्ये कंपनीची १,४११ कोटी रुपयांची उलाढाल होती. ही उलाढाल वाढून २०१४ मध्ये वाढून ६ हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचली. मात्र, कंपनीचे बँक खाती २०१५ मध्ये बुडित झाल्याचे समोर आले. त्यानंतर २०१९ मध्ये कंपनीने घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा-आमच्यात शत्रूत्व नाही; विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा शिवसेनेबाबत सॉफ्ट कॉर्नर?