नवी दिल्ली - सरकारी कंपनी ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेडने (ईईएसएल) बीएसएनएलबरोबर सामंजस्य करार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी ई-मोबिलिटीसाठी लागणारे चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.
ईईएसएलने बीएसएनएलच्या १ हजार जागांवर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी भागीदारी केली आहे. यामध्ये संपूर्ण देशभरात टप्प्याटप्प्यात चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत. ईईएसएल सेवा देण्यासाठी गुंतवणूक करणार आहे. तर चार्जिंगच्या पायाभूत सुविधांचे काम आणि देखभाल हे पात्र व्यक्तींकडून करण्यात येणार असल्याचे ईईएसएलने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बीएसएनएलकडे जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच वीज चार्जिंगच्या पायाभूत सुविधांसाठी लागणारी वीज जोडणीही बीएसएनएल उपलब्ध करून देणार आहे. चार्जिंग स्टेशनची क्षमता ३०० ए. सी. आणि १७० डी. सी. असणार आहे.
हेही वाचा-एजीआर शुल्क: कुमार मंगलम बिर्ला यांनी दूरसंचार मंत्रालयाच्या सचिवांची घेतली भेट