ETV Bharat / business

आजाराशी लढा देत दिव्यांग सिद्धार्थचे बारावीमध्ये घवघवीत यश - Hsc result 2020

सिद्धार्थ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयचा विद्यार्थी आहे. त्याने संगणक विज्ञान शाखेतून हे गुण संपादन केले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थला शारीरिक त्रास आहे. त्याला 'गठियावात'(आर्थराइटिस) नावाचा आजार आहे. तरीही त्याने बारावीला भरघोस यश संपादन केले आहे.

Hsc result
आजाराशी लढा देत दिव्यांग सिद्धार्थचे बारावीमध्ये घवघवीत यश
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:23 AM IST

Updated : Jul 17, 2020, 11:43 AM IST

नागपूर - बारावीचा निकाल लागतच सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे दिसून येत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना पेढे खाऊ घातले जात आहेत. नागपुरातही अत्यंत उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. नागपुरातील दिव्यांग असलेल्या सिद्धार्थ उमाठेने स्वतःच्या शारीरिक कमकुवतेवर मात करत बारावीत ८४.०५ टक्के इतके गुण मिळवले आहे. त्यामुळे सिद्धार्थचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आजाराशी लढा देत दिव्यांग सिद्धार्थचे बारावीमध्ये घवघवीत यश

ध्येय गाठायचं असेल तर जिद्द हवी असे बहुतांशवेळी बोलल्या जाते. नेमके याच वाक्याला सत्यात उतरवले ते नागपूरच्या सिद्धार्थ उमाठे या बारावीतील विद्यार्थाने. सिद्धार्थ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयचा विद्यार्थी आहे. त्याने संगणक विज्ञान शाखेतून हे गुण संपादन केले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थला शारीरिक त्रास आहे. त्याला 'गठियावात'(आर्थराइटिस) नावाचा आजार आहे. हा आजार सिद्धार्थ ४ वर्षाचा असल्यापासून आहे. त्यामुळे त्याला दिवसातून १३ वेळा औषधी घ्यावे लागतात.

दर महिन्याला विविध तपासणी करावी लागते. अशातच ऐन बारावी परिक्षेच्या वेळी प्रकृती बिघडली होती. मात्र, तरी सिद्धार्थने माघार न घेता अभ्यास करून हे यश मिळवले. विशेष बाब म्हणजे सिद्धार्थला पेपर लिहिण्यासाठी लेखनिक लागत असे, परंतु यावेळी मात्र त्याने कोणाची मदत न घेता स्वतः पेपर लेखन केले. यावेळी त्याला त्रासही झाल्याचे सिद्धार्थने सांगितले. परंतु यशासाठी संघर्ष हा करावाच लागतो, असे मत सिद्धार्थ यांनी व्यक्त केले.

सिद्धार्थच्या वडिलांचा व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहेत. परंतु आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळे यशापर्यंत पोहचता आल्याचे सिद्धार्थ यांनी सांगितले. खर तर सिद्धार्थ याला भविष्यात स्पर्धा परिक्षा करून प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावेळी त्याने यांनी सांगितले

Last Updated : Jul 17, 2020, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.