ETV Bharat / business

दिनेश कुमार खारा स्टेट बँकेचे नवे चेअरमन; आज स्वीकारणार पदभार - स्टेट बँक चेअरमन नियुक्ती

दिनेश खारा यांना गेल्या ३३ वर्षांत कर्मशियल बँकिंग, रिटेल क्रेडिट, एसएमई क्रेडीट, डिपॉझिट मोबाईलिझेशन, इंटरनॅशनल बँकिंग ऑपरेशन्स आणि शाखा व्यवस्थापनाचा अनुभव घेतला आहे. ते आज स्टेट बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.

दिनेश कुमार खारा
दिनेश कुमार खारा
author img

By

Published : Oct 7, 2020, 12:22 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश कुमार खारा यांची याच बँकेच्या चेअरमनपदावर नियुक्ती केली आहे. ही निवड ७ ऑक्टोबरपासून तीन वर्षांसाठी असणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांच्या तीन वर्षांचा कार्यकाळ आज (७ ऑक्टोबर) संपत आहे. बँक बोर्ड ब्युरोने दिनेश कुमार खारा यांची चेअरमनपदावर नियुक्ती करण्याची २८ ऑगस्टला शिफारस केली होती.

खारा यांनी एफएमएस नवी दिल्ली येथून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीत्युत्तर पदवी घेतली आहे. खारा हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे (सीएआयआयबी) सर्टिफाईड असोसिएट आहेत. ते स्टेट बँकेत १९८४ला प्रोबशनरी ऑफिसर पदावर रुजू झाले होते. त्यांना गेल्या ३३ वर्षांत कर्मशियल बँकिंग, रिटेल क्रेडिट, एसएमई क्रेडीट, डिपॉझिट मोबाईलिझेशन, इंटरनॅशनल बँकिंग ऑपरेशन्स आणि शाखा व्यवस्थापनाचा अनुभव घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.