ETV Bharat / business

सहा महिन्यात पहिल्यांदाच डिझेलच्या किमतीत घसरण; पेट्रोलचे दर स्थिर

इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने मार्चनंतर पहिल्यांदाच डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. पेट्रोलचे दर आज स्थिर राहिले आहेत.

पेट्रोल पंप
पेट्रोल पंप
author img

By

Published : Sep 3, 2020, 6:12 PM IST

नवी दिल्ली - गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच डिझेलच्या किमतीत आज घसरण झाली आहे. डिझेलच्या किमतीत प्रति लिटर १६ पैशांची घसरण झाली आहे. नवी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ७३.४० रुपये आहे. यापूर्वी डिझेलचा दर प्रति लिटर ७३.५६ रुपये होता.

इंडियन ऑईल कंपनी, भारत पेट्रोलियम कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने मार्चनंतर पहिल्यांदाच डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. पेट्रोलचे दर आज स्थिर राहिले आहेत. डिझेलचे दर ७ जूननंतर प्रति लिटर १२.५५ रुपयांनी वाढले होते. २५ जुलैनंतर डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. मात्र, दिल्लीत व्हॅटचे दर कमी केल्याने डिझेलचे दर प्रति लिटर ८.३८ रुपयांनी कमी झाले आहेत.

हेही वाचा-'जी २० राष्ट्रसमुहात भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा सर्वात वाईट परिणाम'

पेट्रोलचे दर ७ जूनपासून प्रति लिटर ९.१७ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलचे दर १६ ऑगस्टनंतर प्रति लिटर १.५१ रुपयांनी वाढले आहेत. पेट्रोलचे दर ७ जूननंतर प्रति लिटर एकूण १०.६८ रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा-महामारीत डिजिटल कौशल्यासह दूरस्थ शिकण्याच्या प्रमाणात २४५ टक्क्यांनी वाढ

मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८.७३ रुपये होता. डिझेलचा दर प्रति लिटर ७९.९४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ८३.५७ रुपये आणि डिझेल ७६.९० रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर ८५.०४ आणि डिझेलचा दर प्रति लिटर ७८.७१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८५.०४ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर ७८.७१ रुपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.