नवी दिल्ली - टोळधाडीने देशातील काही राज्यांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान सेवेकरिता सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
टोळधाड हे सामान्यत: कमी उंचीवर आढळून येतात. त्यामुळे विमान उड्डाण करताना व विमान उतरताना धोका असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. विमान उड्डाण करताना टोळधाड आढळल्यास संबंधित वैमानिकाने त्याची माहिती देण्याची गरज आहे. अशा टोळधाडीमधून विमान नेण्याचे टाळावे, असा आग्रही सल्ला डीजीसीएने विमान कंपन्यांना दिला आहे.
हेही वाचा-आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये ४.२ टक्के विकासदर; गेल्या ११ वर्षातील नीचांक
टोळ रात्री हवेतून उड्डाण करू शकत नाहीत, ही आपल्या जमेची बाजू आहे. त्यामुळे यावेळी विमान उड्डाण करण्याची संधी आहे. मोठ्या प्रमाणात टोळधाड आली असताना वैमानिकांना कमी दिसू शकते. अशावेळी वैमानिकांनी वायपरचा वापर करावा, असेही डीजीसीएने म्हटले आहे.
हेही वाचा-सिटी बँकेला आरबीआयचा दणका; नियमपालनात कुचराई केल्याने ४ कोटींचा दंड