ETV Bharat / business

डेलाईटने सोडले डीएचएफएलच्या लेखापरीक्षणाचे काम; कंपनीवर ९० हजार कोटींहून अधिक आहे कर्ज

दुसरी लेखापरीक्षण करणारी चतुर्वेदी अँड शाह ही कंपनीही लेखापरीक्षणाचे काम सोडून देण्याची शक्यता आहे. कारण डीएचएफएलकडून निधीच्या खर्चाची माहितीबाबत लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांना असमाधानकारक प्रतिसाद दिला जात आहे.

author img

By

Published : Aug 5, 2019, 4:22 PM IST

डेलाईट

नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या डीएचएफएलच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. डेलाईट कंपनीने डीएचएफएलचे लेखापरीक्षण करण्याचे काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

डीएचएफएलच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी सोडून दिल्याचे डेलाईटने कंपनी व्यवहार मंत्रालयाला कळविले आहे. या माहितीला सूत्राने पुष्टी दिली आहे. मात्र त्यामागील कारण स्पष्ट करण्यात आले नाही.

लेखापरीक्षण करणाऱ्या डेलाईट कंपनीने तशा प्रकारची माहिती दिली नसल्याचे डीएचएफएलमधील सूत्रांनी सांगितले. दुसरी लेखापरीक्षण करणारी चतुर्वेदी अँड शाह ही कंपनीही लेखापरीक्षणाचे काम सोडून देण्याची शक्यता आहे. कारण डीएचएफएलकडून निधीच्या खर्चाची माहितीबाबत लेखापरीक्षण करणाऱ्या कंपन्यांना असमाधानकारक प्रतिसाद दिला जात आहे.

डीएचएफएलवर सुमारे ९० हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. या कंपनीने सातत्याने कर्ज थकविलेली आहेत. नुकतेच डीएचएफएलने कर्ज फेडण्यासाठी देणीदारांबरोबर (लेंडर) नियोजन करत असल्याचे म्हटले होते. कंपनीला आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मार्च तिमाहीदरम्यान २ हजार २२४ कोटींचा तोटा झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.