ETV Bharat / business

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करा; नितीन गडकरींचा उत्पादकांना सल्ला

नितीन गडकरी म्हणाले, की इलेकट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या दरात करण्यासाठी वाहन उत्पादक संशोधन आणि विकास करू शकतात. त्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची किंमती करण्याची गरज आहे. मात्र, ते किमती कमी करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Nov 7, 2020, 12:42 PM IST

नवी दिल्ली - वाहन उद्योगाने इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सरकारकडून जीएसटी सवलतीसह इतर अनुदान देत इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना सहाय्य केले जात असल्याचेही गडकरी यांनी म्हटले आहे. ते फिक्कीने आयोजित केलेल्या 'इलेक्ट्रिक मोबिलिटी कॉन्फरन्स २०२०' मध्ये बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की इलेकट्रिक वाहनांच्या किमती परवडणाऱ्या दरात करण्यासाठी वाहन उत्पादक संशोधन आणि विकास करू शकतात. त्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची किंमती करण्याची गरज आहे. मात्र, ते किमती कमी करण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत नाही. जर इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले नाही तर, उत्पादनाच्या खर्चात कपात होणार नाही. कुठेतरी आपण सुरुवात करण्याची गरज आहे. सरकारकडून तुम्हाला जीएसटी सवलत व अनुदान देण्यात येते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना वाहनांच्या किमती करणे शक्य आहे, असा त्यांनी उद्योजकांना सल्ला दिला.

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने प्रदूषण टळेल-विदेशी चलनाची बचत होईल-

नितीन गडकरी म्हणाले, की इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.

इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांत तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता-

दरम्यान, ई-स्कूटरचे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ओलाकडून विविध राज्य सरकारांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्पची मालकी असलेली एथरएनर्जी, हिरो इलेक्ट्रिक या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे. ओलानेही इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेतल्यास या क्षेत्रात तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.