ETV Bharat / business

मुंबई: बँक कर्मचारी संपाने ग्राहकांची गैरसोय

सरकारी बँकाचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशभरातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे बँकांचे कामकाज मंगळवारीदेखील बंद असणार आहे.

bank strike notice
संपाची नोटीस
author img

By

Published : Mar 15, 2021, 5:17 PM IST

Updated : Mar 15, 2021, 5:27 PM IST

मुंबई - खासगीकरणाविरोधात बँकानी पुकारलेल्या दोन दिवसीय संपाने ग्राहकांची गैरसोय होत आहे. बँकाचे व्यवहार करण्यात गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे.

सरकारी बँकाचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्याला विरोध करण्यासाठी देशभरातील सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे बँकांचे कामकाज मंगळवारीदेखील बंद असणार आहे. युनियन बँक वगळता दादर प्रभादेवीमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र या बँका बंद आहेत. त्यासंदर्भात ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत. बँकांनी बाहेर फलकदेखील लावण्यात आला होता.

बँक कर्मचारी संपाने ग्राहकांची गैरसोय

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये वाढून ४.१७ टक्के

सलग चार दिवस बँका बंद असल्याने बुधवारी बँका सुरू झाल्यावर बँक कर्मचाऱ्यांवर ताण पडणार आहे. त्याचा ग्राहकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. बँका बंद असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. ऑनलाईन व्यवहार जमत नसल्याने समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे बँक खातेदार मिलिंद नागवेकर यांनी सांगितले.

union bank
युनियन बँक

बँकांच्या खासगीकरणाला कर्मचारी संघटनांचा विरोध-

अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन सरकारी बँका आणि विमा कंपनीचे यावर्षी खासगीकरण करण्याचे जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात 9 राज्य बॅंकांच्या संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सोमवारी आणि मंगळवारी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे बँकांचे 10 लाख कर्मचारी दोन दिवस कामावर येणार नाहीत. त्यामुळे बँकांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या 4 वर्षात 14 सार्वजनिक बँका विलीनीकरण करण्यात येणार आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. मात्र दोन बँकांचं खासगीकरण झाले तर त्यांची संख्या 10 वर येणार आहे.

हेही वाचा-बँक कर्मचारी संघटनांच्या संपांनी देशामध्ये बँकांचे कामकाज विस्कळित

युनियनचा बँक कर्मचारी संपाला पाठिंबा
युएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीईसीआय) इत्यादींचा समावेश आहे. इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर (एनओबीओ) या संपात सहभागी आहेत.

Last Updated : Mar 15, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.